ऑनलाईन टीम / श्रीनगर
काँग्रेस नेते राहुल गांधी सद्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. नुकतंच त्यांनी 15 किलो मीटर पायी जात माता वैष्णवी देवीचे दर्शन घेतला असल्याचा व्हिडिओ काँग्रेसने प्रसारित केला आहे. राहुल गांधी दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. त्यांना अनेक वर्षांपासून वैष्णोदेवीला यायचं होते मात्र तशी राजकिय स्थिती यासाठी फारशी अनुकूल नसल्याने ते येऊ शकले नव्हते. असं काँग्रेसचे जम्मू काश्मीरमधील प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर यांनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांनी मी जेव्हा जम्मु काश्मिरला येतो तेंव्हा आपल्याला घरीच आलो आहे. असे वाटत असल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले.
तसेच मी काश्मिरी पंडित आहे. माझं कुटुंब काश्मिरी पंडित आहे. माझ्या कुटुंबाचे जम्मु काश्मीरशी फार जुनं नातं आहे. मी काश्मीरला आल्यानंतर मला की मी माझ्या घरीच आलो आहे. इथल्या लोकांच्या समस्या मला माझ्याच समस्या आहेत असं वाटतं. म्हणूनच जम्मू -काश्मीरला आपला हक्क मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष केंद्राविरोधात आपलं आंदोलन सुरूच ठेवेल. भाजप पुर्वी काँग्रेसने जम्मु काश्मीरसाठी अऩेक कल्याणकारी योजना राबवल्या मात्र भाजपने अद्याप काहीच केलेले नाही. असे ही ते म्हणाले.
आज पंडितांचं शिष्टमंडळ राहुल गांधी यांना भेटले. यावेळी काश्मिरी पंडितांशी चर्चा करताना राहुल गांधी यांनी यांनी आपण त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी करणार असल्याची ग्वाही ही यावेळी दिली. तसेच “आज देशातील जनता त्रस्त आहे. महागाई गगनाला भिडत असताना दिसत आहे. परिस्थिती बिकट आहे. देशातील गरीब माणसाला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं देखील कठीण होत असल्याचे सांगत मोदी सरकारवर निशाणा साधला.