वृत्तसंस्था/ लंडन
प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी येथे झालेल्या सामन्यात हुकमी स्टायकर रोमेलु लुकाकूच्या शानदार दोन गोलांच्या जोरावर चेल्सी फुटबॉल क्लबने ऍस्टन व्हिलाचा 3-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.
गेल्या ऑगस्टमध्ये चेल्सी संघात दाखल झाल्यानंतर लुकाकूने शनिवारच्या सामन्यात दोन गोल नोंदविले. चेल्सीचा तिसरा गोल कोव्हॅसिकने केला. या स्पर्धेतील चेल्सीचा हा दुसरा विजय आहे. या स्पर्धेत मँचेस्टर युनायटेड सरस गोलसरासरीच्या बळावर पहिल्या स्थानावर आहे. चेल्सीने गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळविले आहे.