वार्ताहर/ कराड
कराडचे शिल्पकार स्व. पी. डी. पाटील यांच्या 13 व्या पुण्यतिथीदिनी येथील समाधीस्थळी राज्याचे सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून प्राथमिक स्वरूपात स्व. पी. डी. पाटील यांचे कुटुंबीय व आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब स्मारक समितीच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब गौरव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोक गुजर, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, राजेंद्र माने, शहाजीराव क्षीरसागर, नंदकुमार बटाणे, दिलीपराव चव्हाण, संभाजी सुर्वे, अशोकराव पाटील-पार्लेकर, संगीता साळुंखे, मानसिंगराव पाटील, एन. ए. मुल्ला, प्रकाशबापू पाटील, तानाजीराव साळुंखे, डॉ. विजयराव साळुंखे, जयंतकाका पाटील, सुरेखा जाधव, संजय बदियानी, जशराज पाटील, सागर पाटील, दिग्विजय पाटील, पार्थेश पाटील, रेश्मा कोरे, शोभा पाटील व मान्यवर उपस्थित होते.