प्रतिनिधी / बेळगाव
राष्ट्रीय पौष्टिक मास सप्टेंबर महिन्यामध्ये आचरणात आणला जातो. यावषी ‘फिडींग स्मार्ट, राईट फ्रॉम द स्टार्ट’ हे या मासाचे घोष्यवाक्मय आहे. यानिमित्ताने केएलई स्माईल ट्रेन प्रोजेक्ट विभाग व पौष्टिक आहार विभागाच्यावतीने ‘क्लेफ्ट’ (टाळू आणि ओठ) वाकडे असणाऱया मुलांशी आणि त्यांच्या पालकांशी डॉक्टरांनी संवाद साधला. अध्यक्षस्थानी केएलईचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली होती. प्रमुख पाहुण्या म्हणून केएलई नर्सिंगच्या प्राचार्या डॉ. सुधा रेड्डी, स्माईल ट्रेन प्रोजेक्टचे संचालक डॉ. राजेश पवार उपस्थित होते.
डॉ. पवार यांनी क्लेफ्ट बालकांसाठी पौष्टिक आहाराचे महत्व याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, अशा बालकांना स्तनपान करण्यात तसेच बाटलीने दूध पिण्यात खूप अडचणी येतात. त्यामुळे बऱयाचदा ती कुपोषित होतात. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज भासते आणि म्हणूनच त्यांना पुरक पौष्टिक आहार देण्याची अतिशय आवश्यकता आहे.
केएलईचा स्माईल ट्रेन प्रोजेक्ट 2001 मध्ये सुरू झाला व आजपर्यंत हजारो बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून अशा बालकांना पौष्टिक आहार देवून तज्ञांचे मार्गदर्शनही दिले जाते. या कार्यक्रमास 100 हून अधिक बालक आणि त्यांचे पालक उपस्थित होते. या निमित्ताने चित्रकला आणि वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या.