जागतिक पर्यटनदिनानिमित्त आयोजन : तीन दिवस विविध स्पर्धा, पर्यटन यात्रा,तीन तालुक्यांतील गणेशमूर्तीकारांचे सत्कार
प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडे येथील दयानंद कला केंद्रातर्फे जागतिक पर्यटन दिनानिमित्त 26 ते 28 सप्टेंबर असे तीन दिवस द ग्रेट गणेश दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यात विविध कार्यक्रम तसेच संगीत, नृत्य, कला स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आले आहे. गोवा पर्यटन संचालनालय, भारत पर्यटन मंत्रालय-मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या तीन दिवशीय महोत्सवाचे उद्घाटन रविवार 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. पर्यटनमंत्री नीलेश काब्राल यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दिवसभर विविध प्रकारचे कार्यक्रम होतील. त्यात फुगडी स्पर्धा होणार असून अनुक्रमे पहिले रु. 5000, दुसरे रु. 4000, तिसरे रु. 3000 आणि रु. 2000 ची तीन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनिता नाईक यांच्याशी 9923981979 वर संपर्क साधावा.
कराओके संगीतावर भक्तीगीत गायन स्पर्धा. बक्षिसे अनुक्रमे रु. 1500, रु. 1000, रु. 750 आणि रु. 500 रुपयांची तीन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील. सभागृहात उपस्थित असणाऱयांना यावेळी श्रीगणेश प्रश्नमंजुषा असणार आहे. बंटी उडेलकर हे प्रश्न विचारणार असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील.
घुमट आरती वादन स्पर्धा (सर्वांसाठी) बक्षिसे अनुक्रमे रु. 5000, रु. 4000, रु. 3000 आणि रु. 2000 ची तीन उत्तेजनार्थ दिली जातील. नावनोंदणीसाठी ज्ञानेश्वर नाईक यांच्याशी 9823138373 भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. इको प्रेंडली रांगोळी स्पर्धा – बक्षिसे अनुक्रमे रु. 2000, रु. 1500, रु. 1000 आणि रु. 500 रुपयांची तीन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील. नावनोंदणीसाठी वनिता नाईक याच्याशी 9850298980 वर संपर्क साधावा.
अतुल्य भारत प्रदर्शन यावेळी मांडण्यात येईल. सायंकाळीच्या सत्रात दु. तीन वाजता वेशभुषा स्पर्धा. सर्वांसाठी असून गणेशपुराणातील व्यक्ती चरित्र सादर करावी लागतील. बक्षिसे अनुक्रमे रु. 1500, रु. 1000, रु. 750 आणि रु. 500 रुपयांची तीन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील. नावनोंदणीसाठी सदानंद खांडेकर यांच्याशी 94032733394 वर संपर्क साधावा. श्री बाल गणेश चित्रकला स्पर्धा. बक्षिसे अनुक्रमे रु. 1000, रु. 750, रु. 500 व रु. 300 ची तीन उत्तेजनार्थ देण्यात येतील. नावनोंदणीसाठी भिकू नाईक यांच्याशी 9960141177 वर संपर्क साधावा. पर्यटन निबंध स्पर्धा -घरुन लिहून पाठविणे. बक्षिसे अनुक्रमे रु. 1000, रु. 750, रु. 500 व रु. 300 ची तीन उत्तेजनार्थ देण्यात येतील. नावनोंदणीसाठी नारायण नाईक यांच्याशी 9823391564 यांच्याशी संपर्क साधावा. नारळ फोड स्पर्धा – सर्वांसाठी- बक्षिसे रु. 750, रु. 550, रु. 350 आणि रु. 250 तीन उत्तेजनार्थ बक्षिसे. दुसऱया दिवशी रविंद्र भवन कुडचडे येथे सकाळी 10 वाजल्यापासून विविध स्पर्धा त्यात पर्यटनावर वक्तृत्व स्पर्धा. बक्षिसे अनुक्रमे रु. 1000, रु. 750, रु. 500 व रु. 300 ची तीन उत्तेजनार्थ देण्यात येतील. त्यानंतर होणाऱया समारोप सत्रात सांगे, केपे व धारबांदोडा तालुक्यांतील गणेशमूर्तीकारांचा सत्कार सोहळा तसेच सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात येईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साबांखामंत्री दीपक पाऊसकर उपस्थित राहणार आहे. सर्व स्पर्धकांनी वेळेवर हजर रहावे असे आवाहन सचिव बंटी उडेलकर यांनी केले असून अधिक माहितीसाठी त्यांना 9823010345 वर संपर्क साधावा.