ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशच्या भिंड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी बस आणि कंटनेरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 13 जण जखमी असून, त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज सकाळी गोहद स्टेशनच्या डांग बिरखडीजवळ राष्ट्रीय महामार्गावर बस आणि कंटेनरची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 13 प्रवाशी जखमी झाले असून, चौघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना ग्वालियर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अपघातातील सात जणांच्या अकाली निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या कुटुंबांना दु:ख सहन करण्याची शक्ती देण्याची प्रार्थना त्यांनी ईश्वराकडे केली आहे’, असे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे.