प्रतिनिधी /बेळगाव
येथील अखिल कर्नाटक गोंधळी समाज संघटनेच्या बेळगाव शहर शाखेसाठी पदाधिकाऱयांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी कृष्णा आप्पासाहेब माने तर उपाध्यक्षपदी रायाप्पा देवाप्पा जोशी यांची निवड करण्यात आली आहे.
शुक्रवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे झालेल्या समाज बांधवांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. अन्य पदाधिकारी पुढील प्रमाणे…. खजिनदार आनंद विठ्ठल गोंधळी, सरचिटणीस गोपाल नारायण भिसे, सचिव शामसुंदर आप्पाजी येळ्ळूरकर, सहसचिव चंदन आप्पा जोशी, सतीश लक्ष्मण भिसे, मंजुनाथ तुकाराम मुत्तुडकर, दीपक जोशी तर सल्लागार समितीत शंकर दुंडाप्पा जिरगे, मल्लेशी दुंडाप्पा जिरगे, विष्णू यल्लाप्पा सुगतेकर, आनंद टोंपाजी पाचंगे, माणिकराव शिवराम घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे.