वार्ताहर/ सांबरा
श्रीक्षेत्र पंतबाळेकुंदी येथील श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा पुण्यतिथी उत्सव यावषी सांकेतिक स्वरुपात करण्यात येणार आहे. गुरुवार दि. 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून ते सोमवार दि. 25 ऑक्टोबरच्या पहाटे सहा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे.
जिल्हाधिकारी बेळगाव यांच्या आदेशानुसार व शनिवारी झालेल्या व्यवस्थापक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या दरम्यान भाविकांनी पंतबाळेकुंद्री येथे दर्शनासाठी येऊ नये. भक्तांनी आपापल्या गावातील मंदिर किंवा घरामध्ये पूजाआरती करून उत्सव साजरा करावा, असे आवाहन श्री दत्तसंस्थान पंतबाळेकुंद्री यांनी केले आहे. तसेच सोमवार दि. 25 ऑक्टोबरपासून मंदिर नित्य दर्शनासाठी खुले असणार आहे.