प्रतिनिधी /बेळगाव
जागतिक दृष्टीदिनाच्या निमित्ताने अयोध्यानगर येथील डॉ. कोडकिणी सुपरस्पेशालिटी आय सेंटर येथे आयलाईट आय ड्राय सूट व रेमिडीओ ईमेज सिस्टीम या नवीन साधनांचा उद्घाटन समारंभ गुरुवारी सायंकाळी पार पडला. अशोक आयनचे सहसंचालक जयंत हुंबरवाडी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी संचालिका डॉ. शिल्पा कोडकिणी यांनी स्वागत करून नवीन तंत्रज्ञान आणि उपयोग याबद्दल माहिती दिली. यंदा ‘आपल्या डोळय़ांवर प्रेम करा’ हे दृष्टिदिनाचे घोषवाक्मय आहे. याबद्दल बोलताना डॉ. कोडकिणी म्हणाल्या, नवीन उपकरणांमुळे डोळय़ांचा फोटो काढणे शक्मय होणार आहे आणि प्रत्यक्ष फोटोद्वारे रुग्णाला त्याच्या डोळय़ांमध्ये काय समस्या आहे, हे सांगणे शक्मय होणार आहे.
दिवसभरात डोळय़ांच्या पडद्याचा वापर अधिक होत असल्याने डोळय़ांवर ताण पडतो. त्यावर औषधाचे थेंब घालणे हाच एक उपाय होता. परंतु कोडकिणी आय सेंटरमध्ये डोळय़ांच्या पापण्यांना ‘लो लाईट एनर्जी’ पुरविली जाते. त्यामुळे अश्रू पिंडातून जास्त सक्षमपणे आणि परिणामकारकरित्या अश्रू तवू लागतात. नवतंत्रज्ञानामुळे डोळय़ांच्या समस्या लवकर समजण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
जयंत हुंबरवाडी यांनी कोडकिणी आय सेंटरने बेळगावकरांसाठी ही नवीन सेवा सुरू केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व या सेंटरचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले. कीर्ती नेरलेकर यांनी आभार मानले.