प्रतिनिधी /पणजी
गोवा शालान्त व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बदलत्या परीक्षा पद्धतीप्रमाणे आता आपल्या नव्या वेळापत्रकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 10 वीची पहिल्या सत्राची परीक्षा दि. 1 डिसेबंरपासून तर दुसऱया व अंतिम सत्राची परीक्षा सत्राची परीक्षा दि. 4 एप्रिलपासून सुरू होणार आहे. तर 12 वीची पहिल्या सत्रातील परीक्षा दि. 8 डिसेंबर पासून व दुसरी आणि अंतिम परीक्षा दि. 18 मार्चपासून सुरू होणार आहे.
या परीक्षा शाळा घेणार असून शालान्त मंडळातर्फे परीक्षेचे पेपर्स देण्यात येणार आहेत. आतापर्यंत 10 वी व 12 वीच्या परीक्षा मार्च व एप्रिलमध्ये घेतल्या जात असत. परंतु, आता परीक्षांचा संपूर्ण पॅटर्न बदलला आहे. पहिल्या टर्ममध्ये दोन चाचणी परीक्षा प्रत्येकी 20 गुणांची तर पहिल्या सत्रातील परीक्षा प्रत्येकी 40 गुणांची राहील. दुसऱया सत्रामध्येदेखील दोन चाचणी परीक्षा व अंतिम परीक्षा प्रत्येकी 40 गुणांची घेतली जाईल. हे सर्व गुण एकत्र करून त्यातून विद्यार्थ्यांचे निकाल दिले जातील.
पहिल्या टर्ममध्ये 50 टक्के अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल. पुढील टर्ममध्ये 50 टक्के अभ्यासक्रम होईल. दोन्ही परीक्षा बोर्डामार्फत घेतल्या जाणार आहेत.