ऑनलाईन टीम / मुंबई :
कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात मुख्य साक्षीदार बनलेल्या किरण गोसावीने शाहरूख खानकडे 25 कोटींची मागणी केली होती. ही डील 18 कोटींना सेटल होणार होती. यामधील 8 कोटी एनसीबी अधिकाऱयांना देण्यात येणार असल्याचा धक्कादायक खुलासा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने रविवारी केला. त्यानंतर राजकीय नेत्यांसह अनेकांनी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी खात्यांतर्गत चौकशी करण्यात आहे.
व्हिजिलन्स विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. या चौकशीसाठी समीर वानखेडे यांना दिल्लीला बोलवले जाणार आहे. तसेच पंच प्रभाकर साईल यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. या संपूर्ण चौकशीनंतर याचा अहवाल व्हिजिलन्स विभागाकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर समीर वानखेडेंच्या तपासाबाबतचा पुढील निर्णय होऊ शकतो.