गर्लप्रेंड डिलन मिलरसोबत एंगेजमेंट
हॉलिवूड फिल्म सीरिज ‘ट्वाइलाइट’मुळे जगभरात प्रसिद्ध झालेली अभिनेक्षी क्रिस्टन स्टीवर्टने स्वतःची गर्लपेंड डिलन मेयर हिच्यासोबत एंगेजमेंट केली आहे. 31 वर्षीय क्रिस्टनने ‘द हावर्ड स्टर्न शो’दरम्यान ही माहिती दिली आहे. लवकरच मी माझी स्क्रीनराइटर गर्लप्रेंड डिलनसोबत विवाह करणार असल्याचे तिने म्हटले आहे.
मेयरनेच मला प्रपोज केले होते. मी देखील प्रपोज करू इच्छित होते. मला जे हवे होते ते मी मिळविल्याचे आता वाटत असल्याचे क्रिस्टनने शोदरम्यान सांगितले आहे. क्रिस्टन आणि डिलन यांची भेट 2019 मध्ये एका कॉमन प्रेंडच्या पार्टीदरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांनी परस्परांना डेट करण्यास सुरुवात केली होती.
यापूर्वी डिलन मेयरने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकौंटवर क्रिस्टनसोबतचे एक छायाचित्र शेअर केले होते. क्रिस्टनने यापूर्वी ट्वाइलाइटचा अभिनेता रॉबर्ट पॅटिन्सनलाही डेट केले आहे. क्रिस्टनचा आगामी चित्रपट ‘स्पेन्सर’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती प्रिन्सेस डायना यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे.