तीन्ही कंपन्या शिरोळ तालुक्यातील
प्रतिनिधी / कोल्हापूर
ऐन दिवाळीत मिठाईची मोठÎा प्रमाणात मागणी असते. या मिठाईसाठी लागणाऱ्या बनावट व भेसळयुक्त खव्याची विक्री शिरोळ तालुक्यातील तीन कंपन्यामधून होत असल्याची माहीती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहीतीनुसार अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता व गुप्तवार्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर तसेच अन्न सुरक्षा अधिकारी शिर्के आदींच्या पथकाने ही कारवाई करून, या कारवाईमध्ये सुमारे 20 लाख रूपयाचा दीड हजार किलो खवा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध शासनाकडून करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे जिल्हयात मोठी खळबळ उडाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शिरोळ तालुक्यातील तीन कंपन्यांवर एकूण चार ठिकाणी छापा टाकून भेसळयुक्त खवा आणि त्यासाठी वापरण्यात येणारे साहीत्य जप्त करण्यात आले आहे. या तीनही कंपन्या शिरोळ तालुक्यातील असून या कारवाईमुळे त्यांचा काळाबाजार उघड झाला आहे. मोठÎा प्रमाणात चुकीच्या पद्धतीने भेसळयुक्त खवा बनवला जात असल्याची गुप्त माहीती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरोळ तालुक्यातल्या शिवरत्न मिल्क अँड मिल्क ऍग्रो प्रॉडक्ट, अमवा मिल्क अँड मिल्क एग्रो प्रॉडक्ट, गणेश मिल्क प्रॉडक्ट या कंपन्यावर छापे टाकण्यात आले. या ठिकाणी भेसळयुक्त खवा बनवला जात असल्याचे उघडकीस आले. या टाकलेल्या छाप्यात जवळपास दीड हजार किलो भेसळयुक्त खवा आणि एकूण 20 लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाची कोल्हापूरातील ही मोठी कारवाई मानली जात आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता व गुप्तवार्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर तसेच अन्न सुरक्षा अधिकारी शिर्के आदींच्या पथकाने केली.
या कारवाईत जप्त केलेला मुद्देमाल पुढीलप्रमाणे. मे. शिवरत्न मिल्क अँड ऍग्रो प्रॉडक्ट, ताकवडे, ता. शिरोळ 499 किलो बनावट खवा, आणि खवा बनविण्याचे साहित्य असा एकूण 11 लाख 37 हजार 458 रुपयांचा साठा. मे. अमवा मिल्क अँड ऍग्रो प्रॉडक्ट, अकिवाट, ता. शिरोळ 497 किलो बनावट खवा आणि खवा बनविण्याचे साहित्य असा एकूण 3 लाख 70 हजार 57 रुपयांचा साठा. मे. गणेश मिल्क प्रॉडक्ट, मजरेवाडी, ता. शिरोळ 432 किलो खवा आणि खवा बनविण्याचे साहित्य असा एकूण 2 लाख 90 हजार 320 रुपयांचा साठा जप्त त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता इतर ठिकाणी ठेवलेला जवळपास 2 लाख 31 हजार 768 रुपयांचाही साठा जप्त करण्यात आला आहे.
येथे क्लिक करत पहा कारवाईचा संपुर्ण व्हिडिओ