120 स्पर्धकांचा सहभाग
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रोलर स्केटिंग अकादमी आयोजित रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप-2021 स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. लिंगराज कॉलेज कॅम्पस मधील केएलई सोसायटी स्केटिंग रिंकवर 500 मीटर व 1000 मीटर इव्हेंट्समध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेत सुमारे 120 स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी रमेश परदेशी, अतुल याळगी, चोकसिंग पुरोहित, तुकाराम पाटील, स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर, गणेश दड्डीकर यांच्या उपस्थितीत स्केटिंग स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
क्वाड स्केटिंग प्रकारात 5 वर्षांखालील वयोगटात मुलांच्या विभागात विधीत कल्याण कुमार बी याने 2 सुवर्ण तर मुलींच्या गटात पूर्वी डोमलेने 2 सुवर्ण मिळविले. 5 ते 7 वयोगटात मुलांच्या विभागात समिध कनगलीने 2 सुवर्ण, रचित नागरेने 2 रौप्य तर शरद निपाणीकरने 2 कांस्य मिळवले. मुलींच्या गटात लावण्या लोहारने 2 सुवर्ण, अल्पिता गवसने 1 कांस्य, शांभवी कट्टीने 2 कांस्य तर गौरी कट्टीने 1 रौप्य मिळविले.
7 ते 9 वयोगटात मुलांच्या विभागात अवनीश कामन्नावरने 2 सुवर्ण, सर्वेश पाटीलने 2 रौप्य तर आर्या कदमने 2 कांस्य तर मुलींच्या विभागात आराध्या पी हिने 1 सुवर्णपदक पटकाविले.
9 ते 11 वयोगटात मुलांच्या विभागात सत्यम पाटीलने 2 सुवर्ण, सुब्रमण्यमने 2 रौप्य, वैजनाथ पाटीलने 2 कांस्य तर मुलींच्या गटात मोनिषा टी हिने 2 सुवर्ण, अनघा जोशीने 2 तर खुशी अगसीमणीने 2 कांस्य मिळविली.
11 ते 14 वयोगटातील मुलांच्या विभागात सौरभ साळुंकेने 1 सुवर्ण व 1 रौप्य, श्री रोकडेने सुवर्ण, रौप्य तर सोहम हिरेमठने 2 कांस्य पटकाविली. याच वयोगटात मुलींच्या विभागात जानवी तेंडुलकरने 2 सुवर्ण, शर्वरी दड्डीकरने 1 रौप्य, श्रेया पाटीलने 1 कास्य, सानवी इटगीकरने 1 कांस्य तर हर्शिता चौगुलेने 1 रौप्य पदक पटकाविले.
14 ते 17 वयोगटातील मुलांच्या विभागात यशवर्धन परदेशीने 1 सुवर्ण, वेदांत जाधवने 1 सुवर्ण व 1 रौप्य तर साईसमर्थ आजेनाने 1 रौप्य व 1 कांस्यपदक मिळविले. 17 वर्षांवरील मुलांच्या विभागात कृष्णा शर्माने 2 सुवर्ण तर याच वयोगटातील मुलींचा विभागात भक्ती हिंडलगेकरने 2 सुवर्ण, खुशी गोठीवरेकरने 2 रौप्य पदके मिळवली.
इनलाईन स्केटिंग प्रकारात 5 ते 7 वयोगटात वल्लभ हिशोबकरने 2 सुवर्ण तर धीमंत कुलकर्णीने 2 रौप्य पदक मिळविले. 7 ते 9 वयोगटात मुलांच्या विभागात विहान कनगलीने 2 सुवर्ण, हिरेन राजने 2 रौप्य तर संकेत निपाणीकरने 2 कांस्य पदके मिळविली. 9 ते 11 वयोगटात मुलांच्या विभागात अवनीश कोरीशेट्टीने 2 सुवर्ण, अथर्व भुतेने 2 रौप्य तर निश्चित भस्मेने 2 कांस्य पदके पटकाविली. याच वयोगटात मुलींच्या विभागात विपुरा काकतीकरने 2 सुवर्ण पदके मिळविली. 11 ते 14 वयोगटातील मुलांच्या विभागात जयधन राजने 2 सुवर्ण तर श्रेयश वाजंत्रीने 2 रौप्य तर मुलींच्या विभागात करुणा वाघेलाने 2 सुवर्ण तर तुळसी हिंडलगेकर हिने 2 रौप्य पदके मिळविली.
14 ते 17 वयोगटातील मुलांच्या विभागात अमेय याळगीने 2 सुवर्ण तर सतरा वर्षांवरील मुलांच्या विभागात यशपाल पुरोहितने 2 सुवर्ण पदके मिळविली.
टेनासिटी प्रकारात 5 ते 7 वयोगटात मुलींच्या विभागात पुनर्वी प्रशांत हिने 2 सुवर्णपदके मिळविली. रमेश परदेशी, अतुल याळगी, चोकसिंग पुरोहित, गणेश दड्डीकर, तुकाराम पाटील, सुर्यकांत हिंडलगेकर आदी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, अनुष्क शंकरगौडा, शुभम साखे, सक्षम जाधव, चिन्मयराज देसाई, प्रशांत कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.