वृत्तसंस्था/ लंडन
प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया न्यू कॅसल युनायटेड फुटबॉल क्लबच्या प्रमुख प्रशिक्षकपदी इडी होवेची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा या क्लबच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी केली.
न्यू कॅसल युनायटेड फुटबॉल क्लबने 41 वर्षीय इडी होवे यांच्याबरोबर 2024 सालापर्यंत नवा करार केला आहे. गेल्या उन्हाळी मोसमामध्ये होवे एएफसी बोर्नमाऊथ क्लबचे प्रशिक्षक होते. आगामी प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत आता न्यू कॅसल युनायटेड क्लबला होवेचे मार्गदर्शन लाभणार आहे.