बेंगळूर / प्रतिनिधी
10 डिसेंबर रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत जवळपास एक लाख मतदार मतदान करतील, ज्यामुळे 25 आमदार निवडले जातील. कर्नाटकच्या मुख्य निवडणूक कार्यालयाच्या प्रसिद्धिपत्रकानुसार, या निवडणुकीत तब्बल 98,846 मतदार मतदानाचा हक्क बजावून उमेदवार ‘स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून’ निवडले जातील.
जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत सदस्यांची नावे यादीमध्ये नाहीत कारण या संस्थांच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत. एकूण 98,846 मतदारांमध्ये 47,368 पुरुष तर 51,474 महिला मतदार आहेत. सर्वाधिक मतदार बेळगावमध्ये (८,८७१) आहेत. म्हैसूर, बल्लारी आणि बेंगळूर अर्बनमधील तीन ट्रान्सजेंडर मतदार आहेत. शासकीय कार्यालयानुसार, एकूण 6,073 मतदान केंद्रे स्थापन केली जातील. 14 डिसेंबर 2021 रोजी निकाल घोषित केले जातील. या निवडणुकांचे निकाल वरच्या सभागृहातील सत्तेचे समीकरण ठरवणार आहेत.