प्रतिनिधी /पणजी
भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाची राज्य कार्यकारी समिती जाहीर करण्यात आली असून त्यात 40 सदस्यांना स्थान देण्यात आले आहे. ओबीसी मोर्चा अध्यक्ष गिरीश उस्कईकर यांनी सदर समिती जाहीर केली. समितीत सहा उपाध्यक्ष असून तेवढेच सचिव आहेत. तर 26 सदस्य आहेत.
भाजप जाती-धर्माचे राजकारण करीत नाही. सर्व जाती-धर्मांना घेऊन हा पक्ष पुढे जातो. सर्व जातीधर्मांचे लोक या पक्षात आहेत, असा दावा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केला आहे. ज्या पक्षांना जातीधर्माचे राजकारण करायचे असेल त्यांना ते करू दे. त्याचा कोणताही परिणाम भाजपवर होणार नाही, असे सांगण्यात आले.
भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाची राज्य कार्यकारी समिती पुढीलप्रमाणे : अध्यक्ष – गिरीश उस्कैकर, सरचिटणीस – अर्जुन मळगावकर, उपाध्यक्ष – नागेश च्यारी, मुक्ता नाईक, सोयरू कोमरपंत, नागेश गोसावी, फेलिक्स रॉड्रीग्स व बाबू झोरे, सचिव – सचिन वेंगुर्लेकर, रामानंद चोडणकर, अवधुत सतरकर, संजय सुर्लकर, गजानन शेट, अरविंद ठक्कर. सभासद – पंढरीनाथ पोळे, देवल आजगावकर, राजेंद्र गावकर, वृंदावन सावंत, वासुदेव विर्डीकर, सुदीप धारगळकर, वासुदेव फडते, गौरीश बोरकर, देविदास बोरकर, उल्हास नाईक, संतोष चोपडेकर, शितल हळर्णकर, विजय बर्डे, मंगलदास उसगावकर, दिनेश तारी, कान्होबा नाईक, राजू पेडणेकर, दीपक च्यारी, विश्वनाथ शिरोडकर, रोशन रेडकर, परेश रावळ, सुदेश नाईक, मुकुंद नाईक, दिगंबर हरमलकर, कृष्णा तोरससकर, विनय साळगावकर.