प्रतिनिधी /म्हापसा
पर्रा उपसरपंचपदी जोसेफीन डिक्रुझ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यासाठी पंचायत मंडळाची विशेष बैठक घेण्यात आली होती. तत्कालीन उपसरपंच कमला लिंगुडकर यांनी त्यांचे नाव सूचविले. तर एडविन पॉल लोबो यांनी त्याला अनुमोदन दिले. या पदासाठी जोसेफीन डिक्रुझ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. या पंचायतीच्या सरपंचपदी डिलायला लोबो आहेत.