ऑनलाईन टीम / सातारा :
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत माण आणि कोरेगाव सोसायटी मतदारसंघात चार उमेदवारांना सम-समान मते मिळाली. त्यामुळे ईश्वरी चिठ्ठी टाकून विजयी उमेदवार घोषित करण्यात आले. माण सोसायटी मतदारसंघात शिवसेनेचे शेखर गोरे यांना तर कोरेगाव सोसायटी मतदारसंघात सुनील खत्री यांना ईश्वरी चिठ्ठीचा कौल मिळाला.
माण सोसायटी मतदारसंघात शिवसेनेचे शेखर गोरे आणि सर्वसमावेशक सहकार पॅनेलचे उमेदवार मनोज पोळ या दोघांनाही प्रत्येकी 36 मते मिळाली. तर कोरेगावमध्ये सुनील खत्री आणि शिवाजीराव महाडिक या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 45 मते मिळाली. त्यामुळे दोन्ही ठिकाणी ईश्वरी चिठ्ठी टाकण्यात आली. माणमध्ये गोरे यांना तर कोरेगावमध्ये खत्री यांना ईश्वरी चिठ्ठीचा कौलानुसार विजयी घोषित करण्यात आले.