क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
नेपाळातील पोखारा येथे होणाऱया 12व्या आंतर राज्य ज्युनियर आणि सीनियर विभागातील टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याचे संघ भाग घेणार आहेत. सदर स्पर्धेचे आयोजन 29 डिसेंबर 2021 ते 2 जानेवारी 2022 या कालावधीत होईल. गोव्याचे ज्युनियर आणि सीनियर क्रिकेट संघ निवडण्यासाठी गोवा टेनिसबॉल क्रिकेट संघटनेने अंतिम टप्प्यातील निवड चाचणी 1 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता कांपाल मैदानावर आयोजित केली आहे. चाचणीत भाग घेणाऱया टेनिसबॉल क्रिकेटपटूंनी आपल्या क्रीडा साहित्यासह संदीप नाविक (9130515089) किंवा वेदांत सावंत यांच्याशी संपर्क साधावा.