ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण करणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने भारतात ही परदेशातुन आलेल्या प्रवाशांच्या द्ववारे शिरकाव केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच भारतातील कर्नाटकमध्ये दोन करोनाबाधितांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळले होते. यानंतर गुजरात आणि त्यापाठोपाठ आता महाराष्ट्रातील डोंबिवलीमध्ये देखील ओमायक्रॉन व्हेरिएंटचे करोनाबाधित सापडले आहेत.
याचबरोबर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेला कोरोनाचे रुग्ण आढळला आहे.
यामुळे देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. टांझानियामधून आलेल्या प्रवाशांमध्ये हा रुग्ण आढळला असून गंभीर बाब म्हणजे भारतात आलेले एकूण १७ परदेशी प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारने आंतराष्ट्रीय विमान तळांवर निर्बंधासाठी गांभिर्याने विचार करणे आवश्यक बनले आहे.