वार्ताहर/ ताम्हाने
देवरुख-संगमेश्वर मार्गावरील कोसुंब गावाजवळ सोमवारी सायंकाळी दुर्मीळ खवल्या मांजर सापडल्याची माहिती देवरुखचे वनपाल तौफिक मुल्ला यांनी दिली.
कोसुंब येथे रस्त्यालगत एका ग्रामस्थाला खवल्या मांजर आढळले. परिसरातील ग्रामस्थांनी हे खवल्या मांजर पाहण्यासाठी गर्दी केली होती. वनविभागाच्या कर्मचाऱयांनी त्याला ताब्यात घेतले. ग्रामस्थांनी खवल्या मांजराला त्यांच्या ताब्यात दिले. पशुवैद्यकीय अधिकाऱयांकडून तपासणीनंतर खवल्या मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती तौफिक मुल्ला यांनी दिली.
…