बेंगळूर
बेंगळूरच्या मैनी प्रिशीशन प्रोडक्टस् यांचा आयपीओ लवकरच सादर केला जाणार आहे. याकरीता परवानगी मिळवण्यासाठी कंपनीने बाजारातील नियामक सेबीकडे रीतसर अर्ज सादर केल्याचे समजते. सदरच्या आयपीओतून कंपनी 900 कोटी रुपये उभारणार आहे. याअंतर्गत 150 कोटी रुपयांचे ताजे समभाग सादर केले जाणार आहेत. प्रवर्तक आणि सध्याच्या समभागधारकांकडून 2.55 कोटी इक्विटी समभाग विक्रीसाठी सादर केले जाणार आहेत.