क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
दैवज्ञ स्पोर्ट्स क्लब आयोजित दैवज्ञ बँक पुरस्कृत दैवज्ञ समाज मर्यादित 23 वी दैवज्ञ चषक आंतरराज्य टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेला 4 जानेवारी पासून व्हॅक्सिनडेपो मैदानावर प्रारंभ होणार आहे.
सदर स्पर्धा दैवज्ञ बँक पुरस्कृत केली असून चांदीचा चषक हे या स्पर्धेचे वैशिष्टय़ होय. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील विजेत्या संघाला आकर्षक चांदीचा फिरता चषक, कायमस्वरूपी चषक व 51 हजार रूपये रोख तर उपविजेत्या संघाला आकर्षक चषक व 25 हजार रूपये रोख अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे उत्कृ÷ फलंदाज, उत्कृ÷ गोलंदाज, उत्कृ÷ यष्टीरक्षक, उत्कृ÷ झेल, उत्कृ÷ संघ, मालिकावीर, प्रत्येक सामन्यातील सामनावीर अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. बाहेरील गावच्या संघांची राहण्याची सोय केली गेली आहे. तरी इच्छुक संघाने आपली नावे 31 डिसेंबर पर्यंत मनोज दत्ताराम वेर्णेकर यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.