चेन्नई
राजीव गांधी हत्या प्रकरणातील सात दोषींपैकी एक असलेल्या नलिनी श्रीहरनला तामिळनाडू सरकारने एका महिन्यासाठी पॅरोलवर जाण्याची परवानगी दिली आहे. नलिनीच्या आजारी आईने पॅरोलसाठी अर्ज केला होता. तामिळनाडू सरकारच्या वकिलांनी उच्च न्यायालयात ही माहिती दिली. नलिनी सध्या वेल्लोर येथील विशेष महिला कारागृहात आहे.