वेंगुर्ले /वार्ताहर-
जर पोलीसांनी आशिर्वाद कॉम्पलेक्समधील शिवराम उर्फ भाऊ बांदेकर (82) यांचेकडे वेळत लक्ष दिले नसते तर त्या व्यक्तीस रहात्याघरी प्राणांस मुकावे लागले असते. त्यास तात्काळ शासकिय रुग्णालयात दाखल करून डॉक्टरांचे वेळेत उपचार मिळवून दिले. वेंगुर्ले पोलीसांच्या या माणुसकिच्या वागणुकिची चर्चा वेंगुर्लेत सर्वत्र हाते असून पोलीसांचे आभारही मानले जात आहेत.
वेंगुर्ले शहरातील आशिर्वाद अपार्टमेंटमधील रहिवासी शिवराम उर्फ भाऊ बांदेकर (82) हे शनिवारी सकाळी नियमीत वेळेत दुध, पेपर व नाष्टा देण्यास आलेल्या संबधितांच्या हाकांना साथ न दिल्याने शेजारी रहाणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजीव लिंगवत यांनी पोलीसांना कळविले. त्यानुसार पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशनचे ट्रफिक पोलीस मनोज परुळेकर व पांडुरंग खडपकर यांना परीस्थिती पाहून वयोवृध्द व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करा. व अत्यावश्यकता जाणून गरज असल्यास तात्काळ शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करा. असे सुचना केल्या. त्यानुसार ट्रफिक पोलीस मनोज परूळेकर व पांडुरंग खडपकर यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. स्वत:ही त्या व्यक्तीस हाका मारुन पाहिल्या पण प्रतिसाद न मिळाला नाही.
या घटनेची कल्पना त्या व्यकतीचा भाचा डॉ. संजू पाटकर यांना कुणीतरी कळविली होती. त्यामुळे ते घटनास्थळी आलेले होते. स्थानिक ग्रामस्थ व त्यांचा भाचा डॉ. संजू पाटकर यांच्या उपस्थितीत सदर दरवाजा एका बाजूने खोलून खुला करण्यांत आला. सदरची व्यक्तीला मधुमेह होता. त्यामुळे कदाचित चुकून शुगरची जादा गोळी घेतली असावी. असे डॉ संजीव लिंगवत यांनी स्पष्ट करून त्यामुळे ते बेशुध्द पडले असावेत. असेही स्पष्ट करण्यांत आले. मात्र दोन्ही पोलीसांनी तत्परता दाखवित बेशुध्दावस्थेतील शिवराम बांदेकर यांना 102 रूग्णवाहिकेतून त्वरीत वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यांत आले. त्यांचेवर डॉ. अतुल मुळे यांनी प्राथमिक उपचार केले. त्यांनंतर त्यांना शुध्द आली. पण ऑक्सीजन लेव्हल खाली असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी त्यांच्या भाच्याच्या सुचनेनुसार कुडाळ येथील आकेरकर रुग्णालयात हलविण्यात आले.