मुंबई
चालू आर्थिक वर्षात 2021-22 च्या पहिल्या 9 महिन्यात देशातील विमान प्रवाशांच्या संख्येत वर्ष 2019-20 च्या समान कालावधीच्या तुलनेत 44 टक्क्यांनी घट झाली आहे. साधारणपणे डिसेंबर 2020 च्या तुलनेत मागील महिन्यात हवाई प्रवाशांची संख्या ही 52 टक्क्यांनी वधारुन 111 लाखावर पोहोचली आहे. सदरची माहिती ही रेटिंग एजन्सी इक्रा रेटिंग्सने आपल्या अहवालामध्ये दिली आहे.
कोरोना विषाणूचा नवा विषाणू ओमिक्रॉनमुळे हवाई वाहतुकीला अडचणीचा प्रवास करावा लागणार असून यामध्ये नवीन नियमावली केली जात आहे. त्यामध्ये डिसेंबर 2021 च्या दरम्यान देशातील विमान प्रवाशांची संख्या नोव्हेंबरच्या तुलनेत 5 ते 6 टक्के अधिक राहिली आहे. या व्यतिरिक्त महिन्याच्या दरम्यान दैनिक उड्डाणांची संख्या 2,800 राहिली. आता पुढच्या दिवसात ओमिक्रॉनचा प्रवास कसा असेल हे पाहावे लागणार असून त्यावरच विमान सेवेचे भवितव्य असेल.