45 वर्षांपासून महिला करतेय संग्रह
ब्रिटनच्या एका महिलेने प्लास्टिकच्या पिशव्या जमा करून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्वतःचे नाव नोंदविले आहे. वेल्सच्या एबर्डेर येथे राहणाऱया 55 वर्षीय एंजेला क्लार्क यांनी हा अनोखा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. एंजेला यांनी 10 हजारांहून अधिक प्लास्टिकच्या पिशव्या जमवून हा विक्रम नोंदविला आहे. परंतु एंजेला यांचा हा प्रवास सोपा नव्हता, त्यांच्यासाठी हे रोमांचक होते. 1976 पासून एंजेला यांना प्लास्टिक बॅग्स जमविण्याचा छंद जडला होता. तेव्हा त्या केवळ 11 वर्षांच्या होत्या.
महाराणींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने विशेषप्रकारच्या प्लास्टिक बॅग्स तयार केल्या होत्या. त्यानंतर एंजेला यांच्या वडिलांनी जर्सी येथून परतल्यावर अत्यंत सुंदर काळी प्लास्टिकची बॅग आणली होती. ही बॅग आवडल्याने एंजेला यांनी ती त्वरित स्वतःच्या खोलीत चिकटवली. तेव्हापासून त्यांना पिशव्या जमविण्याचा छंद जडला.
केवळ एक वर्षात बॅग्स जमविल्यानंतर एंजेला यांनी 200 बॅग्स एकत्र केल्या होत्या. त्यांना बीबीसीच्या एका मुलांशी संबंधित कार्यक्रमात बोलाविण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांच्या या छंदाबद्दल जाणून घेतल्यावर लोकांनी त्यांना बॅग्स पाठविणे सुरु केले. आता त्यांच्याकडे 10 हजारांहून अधिक बॅग्स आहेत. पतीच्या कारखान्यात त्यांनी या पिशव्यांसाठी विशेष जागा निर्माण केली आहे. एंजेला यांच्या संग्रहात 1954 मधील एक बॅग आहे. तर एका बॅगची किंमत 22 हजार रुपये इतकी आहे.