मालवण / प्रतिनिधी-
काही दिवसांपूर्वी ओरोस जिल्हा रुग्णालयात रक्तपेढीमध्ये ब्लड डोनेशनच्या वेळी आवश्यक असणाऱ्या वजनकाट्यांची कमतरता होती व ब्लड डोनेशन बेड हे पूर्णतः खराब अवसतेत असल्याचे रुग्णसेवक राजेश पारधी यांनी अमेय देसाई यांना याची कल्पना देऊन या साठी मदतकार्य करण्याचे सुचवले त्या प्रमाणे ग्लोबल रक्तदाते समूह संघटक परिवारातर्फे अति आवश्यक 5 पाच वजन काटे व ब्लड डोनर कोचचे पूर्ण काम करून त्यावर रेक्झिन मारून सर्व सुस्थितीत करून सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्री श्रीपाद पाटील,व आरोग्य सेवक किशोर नांदगावकर याच्या जवळ ही मदत सुपूर्द करण्यात आली व ब्लड डोनेशन कोचचे रेक्झिन च काम कट्टा येथील कारागीर म्हणून नितीन चव्हाण व त्यांचे मित्र यांना ओरोस ब्लडबँक मध्ये सोबत घेऊन दुपार पर्यन्त खूप सुंदररित्या काम पूर्ण केलं. या वेळी ग्लोबल रक्तदाते परिवाराचे वर्धापन दिनाच्या रक्तपेढी तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या व दिलेल्या भेटवस्तू बदल आभार मान्यात आले.