प्रतिनिधी /पणजी
खकोरोनामुळे गेल्या 24 तसांत म्हणजे मंगळवारी सहाजण दगावले असून 910 नवे बाधित सापडले तर 1794 बरे झाले आहेत. दरम्यान कोरोना संक्रमण घटले असून रूग्ण संख्या कमी होत असल्याचा दावा आरोग्य खात्याने केला आहे.
आरोग्य खात्याचे सचिव राजशेखर, संचालिका आयरा आल्मेदा व गोमेकॉचे डिन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी पणजीत पत्रकार परिषदेत ही मा†िहती दिली.
ओमेक्रॉन कोरोना तपासणीचे जिनो सिक्वेसिंग मशीन आणले असून ते लवकरच कार्यान्वित केले जाणार आहे. वय 15 ते 18 वर्षे गटातील मुलांचे 81 टक्के लसीकरण झाले असल्याचे बांदेकर यांनी सांगितले.
सहा जणांचा बळी गेल्या त्यापैकी पाच जणांनी एकही डोस घेतला नव्हता असे त्यांनी नमुद केले. प्रत्येकाने दोन्ही डोसचे लसीकरण पूर्ण करावे व कोरोनापासून सुरक्षा मिळावावी असे त्यांनी सांगितले.एकूण 6 बळी गेल्याने एकूण मृतांची संख्या 3699 एवढी झाली आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णसंख्या 7870 वर पोहोचली आहे. दिवसभरात 34 जणांना इस्पितळात भरती करण्यात आले तर 23 जणांना घरी पाठवण्यात आले. मंगळवारी एकूण 4648 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यात 910 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यातील 876 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले असल्याचे बांदेकर यांनी सांगितले.