व्हॉट्सऍप, व्हीचॅट, सिग्नल या ऍपवर भरवसा कमी
2020 मध्ये 1 लाख कोटी एसएमएस अन् एमएमएस
जग टेक्स्ट मेसेजिंगसाठी व्हॉट्सऍप, व्हीचॅट, टेलिग्राम आणि अन्य ऍप्सना प्राधान्य देत आहे. चीनमध्ये व्हीचॅट आणि जपानमध्ये लाइन यासारखे स्मार्टफोन ऍप लोकप्रिय आहेत. परंतु अमेरिकेतील लोक अद्याप 1980 च्या दशकात सुरू झालेल्या शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिस (एसएमएस)वरच भरवसा करतात. व्हॉट्सऍप सारखे ऍप इंटरनेटद्वारे जोडलेले असतात. तर एसएमएस फोन नेटवर्कवर काम करते.
एसएमएसचे लाभ-तोटे
एसएमएस जवळपास प्रत्येक फोनवर काम करते हा याचा सर्वात मोठा लाभ आहे. तर यात सुरक्षा त्रुटी आहेत हे याचे नुकसान आहे. तसेच यात आधुनिक ऍप्सच्या सुविधांचा अभाव आहे. अमेरिकेतील लोकांमध्ये एसएमएसचा मोठा वापर पाहता सर्वात सुविधाजनक तंत्रज्ञान सर्वात चांगले असेल असे नाही हे दर्शवून देतो. अमेरिकेतील लोकांच्या स्मार्टफोनच्या सवयी जगाच्या उर्वरित हिस्स्यांच्या उलट असल्याचेही दिसून आले आहे.
एसएमएसचा मोठा वापर
मोबाइल रिसर्च फर्म स्ट्रटेजी एनालिटिक्सच्या विश्लेषणातून 2020 मध्ये अमेरिकेत एक लाख कोटी प्रायव्हेट आणि कमर्शियल एसएमएस आणि एमएमएस करण्यात आल्याचे समजते. एसएमएस आणि व्हॉट्सऍप यासारख्या कॉर्पोरेट ऍपसह आरसीएसचा (रिच कम्युनिकेशन्स सर्व्हिसेस) वापर केला जाऊ शकतो. यात एसएमएसच्या तुलनेत अधिक सुविधा असल्याचे कंपनीचे संचालक नितेश पटेल यांनी सांगितले आहे.
आयमेसेज
अमेरिकेत एसएमएसचा वापर यासाठी देखील अधिक आहे, कारण ती सुविधा सर्वप्रकारच्या फोनमध्ये उपलब्ध आहे. तेथे आयमेसेजचा वापर करणाऱया व्यक्तीला व्हॉट्सऍपचा वापर करण्यास सांगता येत नाही. तर एसएमएसशी सर्वजण जोडलेले राहू शकतात. तर व्हॉट्सऍपसारख्या मोठय़ा तंत्रज्ञान कंपनीला चालना का द्यावी असे काही लोकांचे मानणे आहे.