किणये : चौगुलेनगर, मच्छे येथील नव्याने बांधण्यात येत असलेल्या मयुरेश्वर गणपती मंदिराचा स्लॅबभरणी कार्यक्रम रविवारी मोठय़ा उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी मोरेश्वर सेवा संघाचे अध्यक्ष शिवा चौगुले हे होते.
उद्योजक गोपाळ देशपांडे, विवेक भादवणकर, अनिश मैत्राणी, श्री. बेळगावकर, दिलीप जोरापुरे, धनंजय पटेल, सदाशिव जिरगे, राजेश अणवेकर, ईराप्पा तल्लूर, माधव एन. आचार्य, बाळकृष्ण नेसरकर, रघु नाईक, यल्लाप्पा शिंदे, पिंटू बस्तवाडकर आदी मान्यवर मंडळींच्या हस्ते स्लॅबभरणीचा शुभारंभ करण्यात आला.
मोरेश्वर सेवा संघाच्यावतीने उपस्थित पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक एम. पी. लाड यांनी केले. सदर मंदिरासाठी 50 लाखांहून अधिक खर्च येणार असून दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन केले. याप्रसंगी विविध मान्यवरांची भाषणे झाली. सूत्रसंचालन आर. के. गुरुव यांनी केले. अर्जुन पाटील यांनी आभार मानले. यावेळी नागरिक उपस्थित होते.