प्रतिनिधी / सातारा :
एखाद्या संकटात अडकल्यावर प्रत्येकजण आपला जीव वाचविण्याकरीता शर्थीचे प्रयत्न करत असतो. असे प्रयत्न मुक जनावरांकडुन ही तितक्याच तत्परतेने करण्यात येतात. अशीच घटना शुक्रवारी एका सांबराच्या बाबतीत घडली. जलाशयात पडलेल्या या सांबराने आपला जीव वाचविण्याकरीता अनेक मैल पोहून शर्थीचे प्रयत्न केले आणि स्वत:चे प्राण वाचविले. हे दृष्य पाहणाऱ्या पर्यटकांकडुन ही आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
पश्चिम घाटातील कोयना अभयारण्यातील एक सांबर वासोटा जंगलातील शिवसागर जलाशय पोहत पार करत असल्याचे दृष्य पर्यटकांना पाहता आले आहे. बामणोलीतून वासोटा जंगल पाहण्यासाठी बोटीने निघालेल्या पर्यटनांना हे दुर्मिळ दृष्य पाहता आले. सांबराकडुन आपला जीव वाचविण्याकरीता करण्यात येत असलेले प्रयत्न येथील पर्यटकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. तसेच बोटीच्या माध्यमातुन या सांबराला हे जलाशय पार करण्याकरीता मदत ही करण्यात आली. एकंदरीत ही घटना पाहता, कोनया अभयारण्यामध्ये वण्यप्राण्यांचे अस्तित्व अद्याप ही अबाधित आहे, हेच या घटनेवरून दिसत आहे.