प्रतिनिधी /बेळगाव
निसर्ग चित्रांसह लँडस्केप, क्रिएटिव्ह, वारली अशी विविध चित्रे बेळगावमध्ये पाहण्याची संधी गुलमोहोर बाग या बेळगावच्या कलाकार गुपने दिली आहे. कलाकारांनी एकत्रित येत अनोखे असे वीस चित्रांचे प्रदर्शन भरविले आहे. रविवारी या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले असून 27 फेबुवारीपर्यंत नागरिकांना प्रदर्शन पाहता येणार आहे.
बिग बझारसमोरील हँड टू माऊथ या कॅफेमध्ये हे प्रदर्शन गुलमोहोर बागने भरविले आहे. आशा राणे, चंद्रकला करगावकर, सी. ए. रांगणेकर, ज्योती शरद, जे. डी. सुतार, कीर्तीलता गणाचारी, नंदा पाटील, पूजा फडके, प्रशांत भिसुरे, प्रवीणकुमार अंगडी, प्रीती पावटे, रोहितराज पाटील, सचिन उपाध्ये, शोभा कुलकर्णी, शिरीष देशपांडे, शिल्पा खडकभावी, शिवाजी बेकवाडकर, स्नेहा गुडी, स्नेहा कंग्राळकर, सुषमा पाटणेकर, वाणी हिरेमठ व वृषाली मराठे या वीस चित्रकारांनी आपली चित्रे या प्रदर्शनात मांडली आहेत.
सकाळी 11 ते रात्री 8 यावेळेत 27 फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. या प्रदर्शनात चित्रांसोबतच वारली पेटिंगचा एक अनोखा कलाविष्कार या ठिकाणी मांडण्यात आला आहे. वारली कलेतून समाज जीवन दर्शविण्याचा हा एक प्रयत्न आहे. मातीच्या भांडय़ांवर ही वारली कला साकारण्यात आली आहे.