केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात चॅलेंजर निपाणी संघाने 7 गडय़ांनी, हिंडाल्को संघाने सिग्नेचर संघाचा 152 धावांनी, विलास बेंद्रे संघाने अर्जुन स्पोर्ट्स संघाचा 6 गडय़ांनी तर तेजल हुबळी संघाने कर्नाटक स्टार स्पोर्ट्स संघाचा 6 गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. भरत गाडेकर हिंडाल्को, आकाश वाघेला निपाणी, नवीन गनेदिनी हुबळी, सुजय कोरवार यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले.
बेळगाव केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात हिंडाल्को संघाने 36 षटकांत 8 बाद 185 धावा केल्या. शाहीद होसमनीने 51, मनोज पाटीलने 35, संतोष गावडेने 40, सुनील पाटीलने 19 धावा केल्या. सिग्नेचरतर्फे सिद्धांत हुलोळीने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सिग्नेचर संघाचा डाव 11.2 षटकात सर्वबाद 33 धावांत आटोपला. एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. हिंडाल्कोतर्फे भरत गाडेकरने 17 धावांत 5, सुनील पाटीलने 3, विशाल संभोजीचेने 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात रॉजर संघाने 21 षटकांत सर्व बाद 90 धावा केल्या. किरण केसरकरने 24, अभिषेक पाटीलने 17 धावा केल्या. चॅलेंजरतर्फे अक्षय वाघेलाने 20 धावांत 5, विजय कांबळेने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना चॅलेंजर निपाणी संघाने 17.3 षटकांत 3 बाद 91 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. शुभम गणेशने 35, ओम भाटीवड्डरने 23 धावा केल्या. रॉजरतर्फे शंकर, रवळू, सचिन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात अर्जुन स्पोर्ट्सने 25.3 षटकांत सर्व बाद 102 धावा केल्या. ओम पाटीलने 29 धावा केल्या. विलास बेंद्रे संघातर्फे अरूण, संदीप, श्रेयांश यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना विलास बेंद्रे संघाने 16.3 षटकांत 4 बाद 103 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. सुरज कोरवारने नाबाद 55, मृत्युंजयने नाबाद 20 धावा केल्या. अर्जुनतर्फे पंकजने 2 गडी बाद
केले.
दुसऱया सामन्यात कर्नाटक स्टार स्पोर्टस् हुबळी संघाने 22.3 षटकांत सर्व बाद 97 धावा केल्या. राघवेंद्र शेट्टीने 22, हर्षदने 21 धावा केल्या. तेजलतर्फे नवीनने 24 धावांत 5 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना तेजल हुबळी संघाने 16.3 4 बाद 98 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. त्यात शिवयोगी मोदीगौडरने नाबाद 47 धावा केल्या. कर्नाटक स्टारतर्फे झरूद्दीनने 3 गडी बाद केले.