लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता ते 25 मार्च रोजी शपथबद्ध होणार आहेत. ‘एनआयए’ने सूत्रांच्या हवाल्याने केलेल्या ट्विटनुसार येत्या शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता शपथविधीचा मुहूर्त निश्चित झाला आहे. शहीद पथ येथील इकाना स्टेडियमवर शपथविधी सोहळा होणार आहे. योगींबरोबरच अन्य काही मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे. नव्या मंत्रिमंडळात महिला आणि तरुणांना अधिक संधी मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. राज्यात सलग दुसऱयांदा भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांचे स्थान अधिकच भक्कम झाले आहे.
सलग दुसऱयांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे योगी हे उत्तर प्रदेशचे पाहिलेच मुख्यमंत्री ठरणार आहेत. या शपथविधी सोहळय़ाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह काही निवडक केंद्रीय मंत्री उपस्थित राहू शकतात. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 403 जागा असणाऱया उत्तर प्रदेशात 255 जागांवार भाजपाने विजय मिळवला आहे. विधानसभेमधील बहुमताचा आकडा 202 इतका असल्यामुळे येथे भाजपला सत्तेचा मार्ग सुकर झाला होता.