कुपवाड/प्रतिनिधी
ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेच्या मेळाव्यास कुपवाड शहरातील नाभिक समाजातील तसेच ओबीसी समाजातील बांधवांनी ताकदीने उतरण्याचे आवाहन ओबीसी व्हिजेएनटी बहुजन परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत गायकवाड व जिल्हा सचिव शरद झेंडे यांनी केले.
कुपवाड शहरातील नाभिक समाजातील तसेच ओबीसी समाजातील समाज बांधवांची कुपवाड येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सांगलीतील स्टेशन चौकात २६ मार्च रोजी ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महामेळावा, याबाबत सर्वांना माहिती देऊन ओबीसींच्या मागण्या व हक्कासाठी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहणेबाबत आवाहन करण्यात आले. या बैठकीस कल्लाप्पा कोरे, संतोष कदम, सागर चिखले, अनिल खंडागळे, तसेच कुपवाड शहरातील नाभिक संघटनेचे आणि ओबीसीचे समाज बांधव उपस्थित होते.