प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हय़ातील निवासी शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी रविवारी बेळगावसह जिल्हय़ातील 54 पएरीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीतपणे पार पडली. या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांबाहेर जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला होता.
अथणी तालुक्मयातील 3, चिकोडी तालुक्मयातील 7, गोकाक तालुक्मयातील 8, हुक्केरी तालुक्मयातील 4, मुडलगी तालुक्मयातील 6, रायबाग तालुक्मयातील 4, निपाणी तालुक्मयातील 1, बैलहोंगल तालुक्मयातील 4, बेळगाव तालुक्मयातील 4, खानापूर तालुक्मयातील 2, रामदुर्ग तालुक्मयातील 6, सौंदत्ती तालुक्मयातील 5 अशा एकूण 54 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी परीक्षा केंद्रांबाहेर जमावबंदीचा आदेश जारी केला होता. याबरोबरच पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. तसेच परीक्षेवेळी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने काळजी घेतली होती.