12 एप्रिल रोजी घेतली जाणार परीक्षा
प्रतिनिधी/ बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठ (आरसीयू)च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा रविवार दि. 27 रोजी होणारा पेपर तांत्रिक कारणाने रद्द करण्यात आल्याचे विद्यापीठाने कळविले आहे.
पहिल्या सेमीस्टरचे रिपिटर्स, तिसऱया व पाचव्या सेमीस्टरचे रेग्युलर व रिपिटर्स यांची रविवारी परीक्षा होणार होती. 22 मार्चपासून या परीक्षा सुरू असून दि. 27 चा पेपर रद्द करण्यात आला आहे. हा पेपर आता 12 एप्रिल रोजी घेतला जाणार असल्याचे विद्यापीठाने कॉलेजचे प्राचार्य व केंद्र प्रमुखांना कळविले आहे.