प्रतिनिधी/ सातारा
न्यू इंग्लिश स्कूल कण्हेर (ता. सातारा) येथे कै. रामकृष्ण साळवी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतिक कदम यांची उपस्थिती होती.
कण्हेर येथील साळवी कुटुंबाने सामाजिक बांधिलकी जपत कै. रामकृष्ण साळवी यांच्या स्मरणार्थ हायस्कूलमधील तनिष्का दिलीप कडव (इ. 5 वी), तनिष्क अमोल चोरगे व रिया महेंद्र जाधव (इ. 6 वी), दिक्षा सुनील कडव (इ. 7 वी), श्रीराज हणमंत पवार (इ. 8 वी), अक्षदा चंद्रकांत कडव (इ. 9 वी), ऋतुजा राजेंद्र वाघमळे (इ. 10 वी) आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला.
यावेळी युगपुरुष शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि कण्हेर विभागाचे मार्गदर्शक तात्यासाहेब वाघमळे, नंदकुमार साळवी आणि संपूर्ण साळवी कुटुंब उपस्थित होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. जाधव यांनी केले तर आभार श्री. घाटगे यांनी मानले.