प्रतिनिधी /म्हापसा
साईवाडा पिळगाव डिचोली येथील साई मंदिरात दि. 7 रोजी श्री साईबाबांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा 16 वा वर्धापनदिन यजमान श्री. व सौ. शिवानी शिवदत्त चोडणकर आणि श्री. व सौ. श्वेता सगुण चांदेलकर यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
यानिमित्त गुरुवार दि. 7 रोजी सकाळी 9 वा. गणपतीपूजन, पुण्याहवाचन, आचार्यादी, ब्राह्मणवरण, स्थलशुद्धी, श्री साई पादुकाभिषेक, लघुरुद्र, महापूजा, संग्रह साईमदिमन स्त्रोग-विधान-ब्रह्मादिमंडलदेवता स्थापना, मुख्य देवता स्थापना, अग्नीस्थापना, नवग्रह, ग्रहहोम, मुख्यदेवता हवन, बलीदान, पूर्णाहुती, अभिषेक, आरती, सार्वजनिक गाऱहाणे, तीर्थप्रसाद होणार आहेत. दुपारी चंदन फोगेरी (डिचोली) यांच्यातर्फे महाप्रसाद, रात्री 8 वा. आरती, तीर्थप्रसाद, रात्री 9.30 वा. विनोदी मराठी नाटक ‘अशी ही बनवाबनवी’, शुक्रवार दि. 8 रोजी सकाळी 9 ते 12 पर्यंत पादुकाभिषेक, आरती, तीर्थप्रसाद तद्नंतर श्री साईनाथ महिला मंडळातर्फे महाप्रसाद, रात्री 8 वा. आरती, तीर्थप्रसाद, रात्री 9.30 वा. श्री साईबाबांच्या चमत्कारांवर आधारित साई सावली परिवार निर्मित नाटक ‘तुझीच लीला साई’ सादर होईल.
शनिवार दि. 9 रोजी सकाळी 9 ते 12 पर्यंत पादुकाभिषेक, आरती, तीर्थप्रसाद तद्नंतर सिद्धेश पिळगावकरतर्फे सार्वजनिक महाप्रसाद, रात्री 8 वा. आरती, तीर्थप्रसाद, 9.30 वा. अभियान आर्ट आणि रायकर प्रॉडक्शन पर्वरीतर्फे कोकणी नाटक ‘आता हें अशेंच’, रविवार दि. 10 रोजी श्री रामनवमीनिमित्त पहाटे 5 वा. काकडआरती, सकाळी 9 वा. पादुकाभिषेक, दु. 12 वा. श्रीरामजन्म सोहळा, आरती, तीर्थप्रसाद, दुपारी सदानंद आमोणकरतर्फे महाप्रसाद, सायं. 5.30 वा. श्री प्रतिमेची पालखीतून गावात मिरवणूक तद्नंतर आरती, तीर्थप्रसाद व स्थानिक कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम.
सोमवार दि. 11 रोजी सकाळी 9 ते 12 पर्यंत पादुकाभिषेक, आरती, तीर्थप्रसाद तद्नंतर गुरुदास नोनो गावठणकर (डिचोली) यांच्यातर्फे महाप्रसाद, सायं. 7 वा. गोपाळकाला, दहीहंडी उत्सव, आरती, तीर्थप्रसादाने उत्सवाची सांगता होईल. रात्री 9 वा. ‘गोमंतकातील लोकनृत्य’ सादर होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री साई सेवाधाम उत्सव कमिटी पिळगावतर्फे करण्यात आले आहे.