प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री विमला रमण स्वतःचे चित्रपट आणि सौंदर्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात असते. या 40 वर्षीय अभिनेत्रीने विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेता विनय रायसोबत विमला सप्तपदी चालणार आहे. अलिकडेच दोघेही मालदीवमध्ये व्हेकेशनसाठी गेले होते.
विनयने स्वतःच्या कारकीर्दीची सुरुवात ‘उन्नाले उन्नाले’ चित्रपटाद्वारे केली होती. विनयच्या फीमेल फॉलोअर्सची यादी मोठी आहे. विनयने 2017 मध्ये ‘थुप्परीवलम’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती आणि तेथूनच तो लोकप्रिय झाला. आता तो ‘ओह माय डॉग’ या चित्रपटात काम करत आहे.
ऑस्ट्रेलियात जन्मलेली अभिनेत्री विमला रमणने ‘पोई’ या चित्रपटाद्वारे अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. इरुट्टू या चित्रपटात ती यापूर्वी दिसून आली होती. सध्या ती ‘ग्रँडमा’ या चित्रपटाचे चित्रिकरण करत असून हा चित्रपट मल्याळी आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.