चिपचा तुटवडा ःएप्रिलमध्ये वाहनांचा पुरवठाच नाही : वेटिंग कालावधी वाढला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगभरामध्ये सेमीकंडक्टरचा अपुरा पुरवठा होत असून याचा फटका उत्पादनावर होताना दिसतो आहे. सेमीकंडक्टरने पुन्हा एकदा कंपन्यांपुढे अडचणी उभ्या केल्या आहेत. यात आता हिरो इलेक्ट्रिकची भर पडली आहे.
रशिया आणि युपेन यांच्यातील युद्धाचा परिणाम इलेक्ट्रिक दुचाकी वाहन क्षेत्रातील कंपनी हिरो इलेक्ट्रिक यांच्यावरही होताना दिसतो आहे. गेल्या एप्रिल महिन्यामध्ये हिरो इलेक्ट्रिकने आपल्या विपेत्यांकडे एकही गाडी विक्रीकरीता पाठवली नसल्याचे समजते.
विक्रेत्यांकडे गाडय़ाच नाहीत
कंपनीने दिलेल्या नव्या माहितीनुसार चिपच्या तुटवडय़ामुळे हिरो इलेक्ट्रिकच्या उत्पादनावर व्यापक स्वरुपात परिणाम होत आहे. कंपनीला आपले उत्पादन घटवावे लागते आहे. उत्पादनच नाही तर गाडय़ांचे वितरण कुठले करणार अशी समस्या कंपनीपुढे आहे. एप्रिल महिन्यामध्ये विपेत्यांकडे इलेक्ट्रिक दुचाकींचा पुरवठा करण्यात कंपनीला अडथळे जाणवले आहेत.
वेटिंग परेड लांबला
ग्राहकांचा वेटिंग परेड दुचाकी खरेदीसाठी वाढतो आहे. आता सध्याला ग्राहकांना इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करायची झाल्यास 60 दिवस इतके थांबावे लागत आहे. काही विपेत्यांकडे तर इलेक्ट्रिक दुचाकीही विक्रीसाठी उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अनंत अडचणींचा सामना हिरो इलेक्ट्रिकला या काळामध्ये करावा लागतो आहे.