इस्लामाबाद
जम्मू काश्मीरमध्ये जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनंतर दुसऱयाच दिवशी पाकिस्तानात भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवारी सकाळी 6.18 वाजता जाणवलेल्या धक्क्याची तीव्रता 5 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किमी अंतरावर होता. या भूकंपानंतर लोकांमध्ये घबराट पसरली. काही लोकांनी भीतीने मोकळय़ा मैदानात धाव घेतल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. यापूर्वी गुरुवारी जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचे केंद्र ताजिकिस्तानमध्ये 170 किमी खोल असल्याचे सांगण्यात आले.