तंत्रवैज्ञानिक प्रतिभा केवळ सुशिक्षित माणसालाच अवगत असते असे नाही, हे अनेक उदाहरणांवरून सिद्ध झाले आहे. उत्तर प्रदेशातल्या बस्ती जिल्हय़ातील एका शेतकऱयाने केवळ 1 लाख रुपये खर्चात मोडक्मया बाजारातील साधनांपासून रेसिंग कार बनविण्याचा चमत्कार घडवून दाखविला आहे. तो पाहून भारतातील एक प्रसिद्ध मोटारनिर्मिता आनंद महिंद्रा देखील आश्चर्यचकित झाले आहेत. या शेतकऱयाचे नाव शिवपूजन असे असून त्याने ही ‘जुगाडू कार’ बनविली आहे. सध्या ही कार सोशल मिडियावर प्रसिद्ध असून अनेकजण तिच्याविषयी चौकशी करीत आहेत. आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर ही माहिती शेअर केली असून तसेच शिवपूजन यांना भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे.
लहानपणापासूनच शिवपूजन यांना वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड होती. गरिबीमुळे इंजिनियर बनण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. तथापि, त्यांनी नवनव्या वस्तू बनविण्याचे आपले प्रयोग सोडले नाहीत. कालांतराने त्यांनी वेल्डींगचे काम शिकून घेतले. वेल्डींगच्या माध्यमातून वेगवेगळी साधने बनविताना त्यांना अशी कार बनविण्याची कल्पना सुचली. त्यांनी आपल्या बंधूंकडून एक लाख रुपये उसने घेऊन कारनिर्मितीचा प्रयोग सुरू केला. दोन वर्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर त्यांची ही होममेड कार रस्त्यावरून धावूही लागली. ते पाहून गावातील लोक आश्चर्याने थक्क झाले. प्रारंभिक यश मिळाल्यानंतर त्यांनी या कारमध्ये सुधारणा करून तिचा वेग मोठय़ा प्रमाणावर वाढविला. शिवपूजन यांनी याच कालखंडात दूधविक्रीचा धंदाही सुरू केला होता. आता ते दुचाकीवरून दूधविक्री करण्याऐवजी या कारमधून ती करतात. कारमध्ये दुचाकीपेक्षा जास्त दूध वाहून नेण्याची क्षमता असल्याने कमी प्रवास खर्चात अधिक घरांमध्ये ते दूध घालू शकतात. त्यांची ही जुगाडू कार पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनली असून या प्रतिभाशाली तंत्रज्ञाला अधिक चांगले प्रशिक्षण आणि आर्थिक साहाय्य मिळाल्यास तो आणखी आश्चर्य घडवू शकेल, असा विश्वास त्यांच्याबद्दल व्यक्त केला जात आहे.