छोटय़ा शहराच्या प्लेबॉयची कहाणी
भूमी पेडणेकरने ‘द लेडीकिलर’ या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. या चित्रपटात ती अर्जुन कपूरसोबत दिसून येणार आहे. दोघांची जोडी पहिल्यांदाच मोठय़ा पडद्यावर झळकणार आहे. सस्पेन्स आणि ड्रामाने भरपूर हा चित्रपट एका छोटय़ा शहरातील प्लेबॉयची कहाणी दर्शविणारा आहे.
द लेडीकिलर सोबत भूमीकडे अनुभव सिन्हा यांचा ‘भीड’, शशांक खेतान यांचा ‘गोविंदा आला रे’, अक्षय कुमारसोबतचा ‘रक्षाबंधन’, सुधीर मिश्रा यांचा ‘अफवा’ आणि गौरी खान निर्मित ‘भक्षक’ हे चित्रपट आहेत. तसेच तिच्या काही चित्रपटांची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.
2022 हे वर्ष माझ्यासाठी अत्यंत व्यस्त दिसत असले तरीही मी याबाबत तक्रार करू शकत नाही. कारण माझ्याकडे काही उत्तम पटकथा आहेत. ‘बधाई दो’ या चित्रपटाच्या यशासह नव्या वर्षाची सुरुवात झाली. यंदा ब्रेक घेण्यासाठी माझ्याकडे वेळ असल्याचे मला वाटत नसल्याचे तिने म्हटले आहे.
‘द लेडीकिलर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बहल करत आहेत. यापूर्वी त्यांनी ‘बीए पास’ आणि ‘सेक्शन 375’ यासारखे चित्रपट निर्माण केले आहेत. तर भूषण कुमार आणि शैलेश आर. सिंह या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.