पृथ्वी ज्या सूर्यमालेची सदस्य आहे, ती सूर्यमाला ‘मिल्की वे’ या आकाशगंगेची सदस्या आहे. आपली आकाशगंगा एका कल्पनातीत विशालकाय अशा कृष्णविवराभोवती फिरत आहे. या कृष्णविवराचे छायाचित्र घेण्यात संशोधकांना प्रथमच यश आले आहे. हे यश अवकाश संशोधनातील ‘मैलाचा दगड’ ठरणार आहे. आतापर्यंत केवळ दोन कृष्णविवरांची छायाचित्र घेण्यात आली आहेत. त्यापैकी पहिले छायाचित्र एप्रिल 2019 मध्ये ‘एम-87’ या आकाशगंगेच्या कृष्णविवराचे होते. आपल्या आकाशगंगेचे कृष्णविवर पृथ्वीपासून 9.5 लाख कोटी किलोमीटर दूर आहे. त्याचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 40 लाख पट अधिक असल्याचे अनुमान आहे. तर त्याचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या काही लाख पट अधिक आहे.
कृष्णविवर हे विश्वातील असे अस्तित्व असते की ज्याचे गुरुत्वाकर्षण अतिशक्तीशाली असते. मृत ताऱयापासून कृष्णविवर बनते. त्याच्या शक्तीशाली गुरुत्वाकर्षणातून प्रकाशकिरणही सुटू शकत नाहीत. त्यामुळे कृष्णविवरांचे छायाचित्र घेणे ही बाब आतापर्यंत अशक्मयप्राय मानली गेली होती. तथापि, होरायझन या महाकाय दुर्बिणीतून हे छायाचित्र घेणे शक्मय झाले आहे.