वझरी गणपती विसर्जन नाल्याच्या कामाचा शुभारंभ
प्रतिनिधी /पेडणे
एखाद्या प्रकल्पाला मंत्री अधिकृतपणे भेट देऊ शकतात. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितले किंवा नाही सांगितले तरी सारखेच, अशी प्रतिक्रिया पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी मंत्री रोहन खंवटे यांच्या पेडणे दौऱयाबाबत व्यक्त केली.
वझरी येथे गणपती विसर्जन नाल्याच्या बांधकामाचा शुभारंभ प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपसरपंच सुरेश परब, पंच सुदाम परब, पंच सुनिता कळंगुटकर, पंच संगीता गावकर, माजी पंच चंद्रकांत सावंत, संजय देवीदास, अशोक कळंगुटकर
स्थानिकांना अपेक्षित अशा विकासाला प्राध्यान्य दिले जाईल. 32 लाख रु. खर्च करून जलसिंचन खात्यामार्फत तळीचे बांधकाम केले जाईल. स्थानिक शेतकऱयांना या तळीच्या पाण्याचा वापर करून शेती पिकवण्यासाठी मोठा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक सरपंच, पंच यांच्या सहकार्याने प्रत्येक गावात अशीच विकास कामे केले जातील असे ते पुढे म्हणाले.
गावात कित्येक वर्षे गरज असलेल्या नाल्याचे बांधकाम होत नसल्याने पंचायत मंडळ चिंतेत होते. पावसाळय़ांत या नाल्याचे पाणी घरांत शिरत असे. कामाला गती देऊन याचा शुभारंभ केल्याबद्दल पंचायत मंडळाने आमदार आर्लेकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.