विभागीय शिक्षण आयुक्तांची कारवाई
सांगली प्रतिनिधी
शिक्षकांना वेतनश्रेणी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या शिक्षणाधिकारी आणि अधीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.
सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे व अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे असे निलंबित केलेल्यांची नावे आहेत. विभागीय शिक्षण आयुक्त सूरज मांडरे यांनी ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांना तीन शिक्षकांकडून १ लाख ७० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यांच्याबाबत झालेल्या कारवाईचा अहवाल आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.