प्रतिनिधी/ म्हसवड
वरकुटे-मलवडी (ता.माण) येथील सुशांत शांताराम जाधव (वय 26) व मंगेश शिवाजी पिसे (वय 25) हे दोघे आपल्या नातेवाईकांच्या विवाह कार्यासाठी सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथे आज रविवारी सकाळी गेले होते. विवाह समारंभ उरकून दोघे वरकुटे-मलवडीकडे दिघंची रोडने येत असताना महुद गावापासून काही अंतरावर चिकमहुद दिंघची रोडवर भरधाव वेगाने निघालेल्या डंपरने वरकुटे येथील दोघांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार दुचाकीला धडक दिली. या धडकेत सुशांत जागेवरच मयत झाला तर मंगेश यास उपचारासाठी दवाखान्यात नेहत असताना मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला डंपर अपघातानंतर निघून गेला या अपघाताचा तपास सांगोला पोलिस करत आहे.
सांगोला तालुक्यातील चिकमहुद दिघंची रोडवर भरधाव डंपरने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या या भिषण अपघातात वरकुटे-मलवडी येथील दोन युवकांचा मृत्यू झाला. सुशांत हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता तो फोटोग्राफी व झेरॉक्स मशिनचे दुकान होते तर दुसरा मयत मंगेश याचे आकलुजला स्वतःचे गॅरेज असून तो मॅकेनिक होता.
दोघे ही आज महुद येथे नातेवाईक यांच्या विवाह समारंभास गेले होते. विवाह उरकून माघारी येत असताना दोघांना भरधाव डंपरने धडक देऊन निघून गेला हा अपघात एवढा भिषण होता सांयकाळी पाचच्या सुमारास हा अपघाताच्या ठिकाणी सांगोला पोलिसांनी पंचनामा करून डंपरचा शोध सुरू केला आहे.